साने गुरुजींनी केलेली मृत्यूची कल्पना
पांडुरंग (शाम) म्हणजे साने गुरुजी पुण्यात शिक्षण घेत असताना अचानक एका रात्री त्याला स्वप्न पडले की आई बोलावत आहे.म्हणत आहे की "शाम कारे आला नाहीस.अजूनही रागावला आहे ना? ये की रे आईला भेटायला. " शाम पुण्यास येताना शिक्षणासाठी घरातून रागावून आला होता.
असे स्वप्न पाहिल्याने रोज आईची आठवण काढणारा शाम ,तिला मनोमन पुजणारा शाम झोपेतून उठून रडू लागला.त्याचा मित्र राम म्हणाला अरे का रडतोस. शाम ने पडलेले स्वप्न सांगितलं. अरे खूप दिवस तू आईकडे गेला नाहीस म्हणून आई स्वप्नात आली असेल.तू आजच आईला भेटायला जा.राम ने पैश्याची जुळवाजुळव करून शामला पाठवून दिले पण आईची भेट व्हायची नव्हती. तीन दिवसांपूर्वीच आई शामला सोडून देवाघरी गेली होती. जाताना सतत शमचीआठवण काढत होती.
आई गेली आणि श्यामचे सर्वस्व हरपले.जिथं आई नाही तिथं आता जगून काई उपयोग. अशी त्याची भावना झाली.पण मावशीने त्याला धीर दिला. वडील व भाऊ यांच्याविषयी कर्तव्याची जाणीव करून दिली.त्यामुळे श्याम सावरला पण जीवनाविषयी आसक्ती उरली नव्हती.आई ला सुखात ठेवणार तिचे सर्व पांग फेडणार हे मनोरथ धुळीस मिळाले. आणि एकप्रकारे मृत्यूची ओढ लागून राहिली.
ते म्हणतात मरण हे दुःखद अजिबात नाही.झाडाची जुनी पाने गळून पडतात कारण नवी पालवी फुटेल आणि पुन्हा सर्वत्र चैतन्य पसरलेले असेल. जर पाने गळून पडली नाही तर नवी पालवी कशी फुटणार.
मृत्यू म्हणजे असा आहे की लहान मुल इकडे तिकडे खेळून खेळून दमते आणि थकल्यानंतर त्याला आईची आठवण येते व तिकडे धाव घेते. आई मुलाला कुशीत घेते व जिवनामृत पाजते. ते पिऊन मूळ पुन्हा ताजेतवाने होते व खेळायला धावते.आपले जीवनही तसेच आहे. थकून गेल्यानंतर हे शरीर धरती मातेच्या स्वाधीन होते. ते चिरकाल विश्रांतीसाठी.
निद्रादेवी नाही का आपणास दिवसभराच्या दगदगीनंतर झोपेच्या अधीन जाऊन पुन्हा सकाळी ताजेतवाने होऊन पुढील कामे करण्यास सिद्ध करते.तसेच या मृत्यू देवीचे आहे. काहीकाळ सर्व क्षीण नाहीसा करण्यासाठी ती आपल्या कुशीत घेत असते. त्यामुळे मृत्यूला न घाबरता मानवाने त्याच स्वागत करायलकधीही सिद्ध असलं पाहिजे.

Comments
Post a Comment