Posts

साने गुरुजींनी केलेली मृत्यूची कल्पना

पांडुरंग (शाम) म्हणजे साने गुरुजी पुण्यात शिक्षण घेत असताना अचानक एका रात्री त्याला स्वप्न पडले की आई बोलावत आहे.म्हणत  आहे की "शाम कारे आला नाहीस.अजूनही  रागावला आहे ना? ये की रे आईला भेटायला. " शाम पुण्यास येताना शिक्षणासाठी घरातून रागावून आला होता. असे स्वप्न पाहिल्याने रोज आईची आठवण काढणारा शाम ,तिला मनोमन पुजणारा शाम झोपेतून उठून रडू लागला.त्याचा  मित्र राम म्हणाला अरे का रडतोस. शाम ने पडलेले स्वप्न सांगितलं. अरे खूप दिवस तू आईकडे गेला नाहीस म्हणून आई स्वप्नात आली असेल.तू  आजच आईला भेटायला जा.राम  ने पैश्याची जुळवाजुळव करून शामला पाठवून दिले पण आईची भेट व्हायची नव्हती. तीन दिवसांपूर्वीच आई शामला सोडून देवाघरी गेली होती. जाताना सतत शमचीआठवण काढत होती. आई गेली आणि श्यामचे सर्वस्व हरपले.जिथं  आई नाही तिथं आता जगून काई उपयोग. अशी त्याची भावना झाली.पण मावशीने त्याला धीर दिला. वडील व भाऊ यांच्याविषयी कर्तव्याची जाणीव करून दिली.त्यामुळे श्याम सावरला पण जीवनाविषयी आसक्ती उरली नव्हती.आई ला सुखात ठेवणार तिचे सर्व पांग फेडणार हे मनोरथ धुळीस मिळाले. आणि एकप्रकारे मृत्यूची ओढ लागू